आई
तुम्हा आम्हा सर्वांच्यात असतो आईपणाचा अंश
जिच्या निव्वळ अस्तित्वानेच टिकून आहे मानववंश
जात, धर्म, वंश, भाषा नाही तिला नाव-गाव
प्रलयाच्या पैलतीरी तिचाच आश्वासक भाव
ती म्हणजे सेवाभाव, ती म्हणजे समर्पण
तिच्या मंद हास्यातून होई प्रभूचे दर्शन
लेकराला न्हाऊ घालणारा बाप पण तीच
मुक्या जीवाला माया लावणारी पण तीच
झाडे लावणारी, जगवणारी पण तीच
नृत्य, नाट्य, गायनाने मने रिझवणारी तीच
अनेक नावे, अनेक रुपे घेऊन येते ती
समस्त सृष्टीचा उद्धार करते ती
कधी ती असते ज्ञानेश्वर, कधी तुकोबा
कधी मुक्ताई, जनाई, कधी संत चोखोबा
कधी धन्वंतरी, कधी नाइटिंगेल
तिचे ऋण कसे बरे फिटेल?
आपणही प्रयत्न करू आई होण्याचा
समस्त सृष्टीला मायेच्या कवेत घेण्याचा
पौर्णिमा दिक्षित, नवीन पनवेल
Be First to Comment