जुना पुलही वाहतुकीसाठी धोकादायक : पुलाचे कठडेही तुटले, प्रवाशांच्या जिवाला धोका
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम यावर्षीही रखडले असून या नदीवरील जुना पूलही वाहातुकीसाठी धोकादायक झाला असुन या पुलाचे कठडे तुटले आहेत.यामुळे या महामार्गावरुन येजा करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील फळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या चौपदरी करणाचे काम गेली दहा ते बारा वर्षा पासुन सुरु असून या कामात कोणतेही प्रगती दिसत नाही तसेच या महामार्गावरील काही ठिकाणच्या पुलाचे काम पुर्ण झाले आहेत तर काही ठिकाणी तसेच रखडले आहे याचप्रमाणे महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम गेल्या वर्षी भर पावसात जोरात सुरु केले होते ते पावसाला संपल्यावर पूर्ण होईल असेच वाटत असतांना दुसरा वर्षीचा पाऊस जवळ आला तरी या पुलाचे काम सुरु झालेले नाही.याविषयी ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी केलेल्या कामाची शासनाकडून बिले न मिळाल्यामुळे काम थांबवले असल्याचे सांगितले आहे. तसेच या नदीवरील ५० ते ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला जुना पूल अतिशय धोकादायक बनला असुन या पुलाच्या दोन्ही बाजुचे कठडे तुटलेले आहेत यावरुन अवजड वाहन गेला तर हा पुल पूर्णपणे हादरला जात असल्याचे जाणवत आहे .त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
सद्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाहतुकीची प्रमाण कमी असले तरी मुंबई-गोवा मार्गावर असणारी अनेक पर्यटन स्थळे व औद्योगिक क्षेत्र यामुळे येथे नेहमी वाहनांची सतत वर्दळ सुरु असते त्यामुळे सतत मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते. यातुन घाईघाईने मार्ग काढताना तुटलेले कठडे लक्ष्यात न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन अशा दुर्लक्षमुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर करोडो रुपये खर्च केले जातात.परंतु अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात अशा घटना न घडण्याअगोदर उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी,बांधकाम विभाग व संबंधीत व्यक्ती यांनी लक्ष देण्याची गरज आहे.असे प्रवाशी वर्गातुन बोलले जात आहे.
Be First to Comment