Press "Enter" to skip to content

पालिकेने रुग्णवाहिका संख्या वाढवावी – महेश गुरव

रुग्णवाहिका कमी असल्याने मृतदेह रुग्णालयात पडून : अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत मृतदेह

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।

कोरोना महामारीत बेड मिळत नाहीत. पण दुर्दैव म्हणजे  मृतदेह वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका पनवेल महानगरपालिकेकडून उपलब्ध होत नसल्याने मृत्यूनंतही त्याची विटंबना थांबली नसल्याचे दिसून येते  तेव्हा वेळीच अंतसंस्कार होण्यासाठी पालिकेकडून रुग्णवाहिका वाढविण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष महेश गुरव यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे. 

कोरोना  हे वैश्‍विक संकट गेल्या दिड वर्षांपासून संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवीत आहे. या आजाराने कोट्यावधी रुग्ण ग्रस्त झाले . अनेक जण या आजारावर मात करत आहेत  या साथीच्या आजाराने आजच्या घडीला सुद्धा जगात  थैमान घातलेला  आहे.  भारतात दुसरी लाटेने दहशत केली असून  याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत.

त्यामुळे बेड सुद्धा कमी पडत आहेत  ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. तर रेमडेसिवीर इंजेक्शन करिता नातेवाईकांच्या धावपळ  दिसून येत आहे. यासाठी प्रयत्नात कुठेही कमी पडत नाहीत  आपला नातेवाईक कसाही परिस्थितीत वाचला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत   एकंदरीतच या शतकामध्ये अत्यंत विदारक अशा परिस्थितीतून संपूर्ण जग जात आहे.  

महाराष्ट्रातील अनेक महानगरांना कोरोनाविषाणूनी ग्रासले आहे. त्याचबरोबर याचा लोण ग्रामीण भागात सुद्धा जास्त प्रमाणात  पोहोचलेला आहे. आज गावागावांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत.  मुंबईचे प्रवेशद्वार असणारे पनवेल मधील वाढत्या रुग्ण संख्सेने  शहरे हाँटस्पाँट बनली आहेत.  मोठी लोकवस्ती असणार्‍या पनवेलला गेल्या दिड वर्षभरापासून कोरोना संसर्गाने घेरलेले आहे. दुसर्‍या लाटेने पनवेलमध्ये  दहशत निर्माण केल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण आहे.  दररोजच्या रुग्णसंख्येने सातशेचा आकडा कधीच ओलांडला आहे. आता या साथीवर पालिकेला नियंत्रण मिळविण्यास काही प्रमाणात  यश आले असले तर मृत्युचे प्रमाण जास्त आहे  शव दहनासाठी जागा मिळण्यासाठी नंबर लावावे लागत असल्याने मृतदेह रूग्णालयात पडून राहत आहेत.

दिनांक 2 एप्रिल रात्री नऊ वाजता सुश्रत हाँस्पिटल कळंबोलीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खारघर स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी   वाहून नेण्यासाठी शिवसेनेचे महेश गुरव यांनी पालिका अधिका-याना फोन करून   रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची विनंती केली असतानाही पालिकेकडून  रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने तो मृतदेह काही तास रू्णालयाबाहेर तसाच पडून होता. स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात पार्थिव अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांना मरणोत्तर सुद्धा यातना सहन कराव्या लागत आहेत. तेव्हा मृत्यू नंतर प्रेताची विटंबना थांबविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने रुग्णावाहिका वाढवाव्यात अशी विनंती शिवसेना रायगड जिल्हा वाहतुक सेनेचे अध्यक्ष महेश गुरव यांनी पनवेल महापालिकेला केली आहे. 

मृतदेहाच्या तुलनेत स्टॅन्ड कमी असल्याने अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागत आहे. तेव्हा खारघर स्मशान भुमीत अत्यसंस्कार होत होते तेव्हा तिथे जावून गर्दी करून कोरोना संसर्ग वाढण्यापेक्षा तेथील अंत्यसंस्कार आटोपल्या नंतर त्वरीत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. 

अभिजित,
 पनवेल महानगरपालिका अधिकारी 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.