सिटी बेल । रोहा । शरद जाधव ।
रोहे तालुक्यातील जामगाव ग्रा. पंचायतीचे तरूण तडफदार उपसरपंच संदेश कोदे यांचे ता.२४ रोजी अचानक दुर्दैवीरित्या दु:खद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
३६ वर्षाचे असणारे संदेश कोदे हे पाथरशेत येथील रहिवासी होते.ता.२४ रोजी त्यांना पहाटे उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रोह्यातील जाधव हाँस्पीटलमध्ये नेण्यात आले.व उपचार सुरू असतानाच डाँक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अखेर त्यांची प्राणज्योत मावळली व त्यांनी जगाचा निरोप घेतला.
संदेश कोदे यांना समाजकारण व राजकारणाची विशेष आवड असल्याने आपला विशेष राजकीय प्रभाव दाखवून त्यांनी खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांचा विशेष विश्वास संपादित केला होता.तर नेहमीच आपल्र्या परिसराचा, गावाचा व ग्रा.पंचायतीच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून संदेश कोदे यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांची उपसरपंचपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सतत दुस-यांसाठी झटणाऱ्या संदेश कोदे यांच्यावर अशी वेळ येईल असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते.त्यांच्या या अंत्यंत दुर्दैवीरित्या झालेल्या दु:खद निधनाने सुतारवाडी परिसरात समाजबांधवांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर समाजासाठी धडपडणारा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला असल्याची खंत येथील सरपंच दर्शना म्हशीलकर यांनी व्यक्त केली आहे.
तर पाथरशेत येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.








Be First to Comment