सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
मोहोपाडा येथील नारायण विष्णू आहिर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी ते 78 वर्षांचे होते.त्यांच्या मृत्यूची वार्तां समजताच अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्ते दिसून आले.
नारायण आहिर हे प्रेमल व मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांचा स्वभावच मनमिलावू असल्याने ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे.त्यांना मोहोपाडा व आसपासच्या गावातील नागरिक आवडीने “अण्णा”तसेच “नाना”असे संबोधायचे.नारायण आहिर काल्या मातीवरती नि:स्वार्थ व निरपेक्ष प्रेम करायचे.त्याच्या दशक्रिया विधी दि.1 मे रोजी श्रीक्षेत्र गुलसूंदे येथे होणार असून उत्तरकार्यं त्याच्या मोहोपाडा येथील राहत्या घरी होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना नातवंडे,पत्नी असा मोठा परिवार आहे.अण्णांच्या अचानक जाण्याने मोहोपाडा गावावर शोककळा पसरली आहे.








Be First to Comment