Press "Enter" to skip to content

गाव तेथे क्वारनटाईन सेंटर ऊभारावे : आत्माराम गावंड यांची मागणी

सिटी बेल । कळंबोली । सुनिल ठाकूर ।
 

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गावातील जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग  क्वारंटाईन सेंटर म्हणून केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊन कोरोना साथीवर नियंत्रण मिळविता येईल असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम गावंड यांनी व्यक्त केले.  

कोरोनाच्या साथीची जनतेते दहशत आहे. वाढत्या रुग्णाच्या संख्येने हाँस्पिटल कमी पडत आहेत.  रुग्णाना बेड उपलब्ध होत नसल्याने काहीना उपचाराविना  जीव गमवावा लागत आहे. असा बिकट परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णाला प्रथम लक्षणॆ दिसताच जागेवरच वैद्यकीय तपासणी  त्यांनी विलगीकरण करून उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. परिणामी  कोरोनाची साखळी तोडून कोरोना साथीवर नियंत्रण मिळविता येईल. यासाठी गावातील जिल्हा परिषदेचे शाळेचा वापर करून त्यावर शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायतीच्या कर्मचा-याचे नियंत्रण ठेवून त्यांना वेळेवर कोरोना नियंत्रण आणण्याचे उपचार केले तर कोरोनाला आपण हरवू शकतो असे मतही व्यक्त केले  

यातून कोरोना रुग्णाना दिलासा मिळून आर्थिक बचत होईल. घरचा डबा, घरचीच  खाट असल्याने कमी खर्चात ज्यास्त पेशंट बरे होतील, अशी उपाय योजना करणे काळाची गरज आहे . गावातील प्रतिष्ठीत नागरिक , तरुण व सामाजिक कार्यकर्त्यानी पुढे येवून  पुढाकार  घेतल्यास हे सहज शक्य आहे या रुग्णाच्या देखभालीसाठी गावातील, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्क्स, नर्स (NM)  मलेरिया (MPW) तसेच  एक जबाबदार शासकीय डाॅक्टर यांची नेमणूक करुन त्या डाॅक्टरांनी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गावात व्हिजीट देऊन पेशंटची परिस्थिती हाताळली आणि  मार्गदर्शन करुन औषधोपचार केल्यास रुग्ण लवकर बरे होतील. आपल्या गावात त्याला उपचार मिळणार असल्याने त्याची अर्धी भीती निघून जाईल.  तसेच  देखरेख  ठेवण्यासाठी व त्यांना येणार्या अडीअडचणी सोडवण्यासाठी गावातील  ग्रामसेवक ,तलाठी ,ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल यांना  शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल तो आपल्याच माणसांच्या नजरे समोर राहणार आहे. असे केल्याने खेड्यातली परीस्थिती लवकर सुधारणा होऊ, शकते असे मला वाटते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.