सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण येथिल जेष्ठ पत्रकार,साप्ताहिक उरण समाचारचे संपादक अतुल पाटील यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, ते ५२ वर्षांचे होते. कोरोना संसर्गामुळे त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उरणमधील पत्रकारितेतील कोरोनाचे पहिले बळी ठरले.
उत्तम संघटक असणाऱ्या अतुल पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता.उरण येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र तब्येत खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही रात्री त्यांना मृत्यूने गाठलेच.
त्यांच्या निधनामुळे उरण एका उमद्या पत्रकारास हरपला असून पत्रकार परिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे.अतुल यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, विवाहित मुलगी जावई, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.अतुल यांच्या निधनाने सर्व थरातून दुःख व्यक्त होत आहे.अतुल पाटील यांची सर्व फॅमिली कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कोणीही सांत्वना साठी त्याच्या घरी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
उरणमधील पत्रकारांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सर्व दवाखाने फुल असून बेड मिळणे कठीण बनले आहे. तरी उरणच्या जनतेने कोरोना बाबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपला व आपल्या कुटूंबाचे रक्षण करण्याचे आवाहन उरणमधील पत्रकारांनी केले आहे.








Be First to Comment