Press "Enter" to skip to content

उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वन योद्ध्यांचा सन्मान

चिरनेर येथील अक्कादेवी कलम डोंगर परिसरांत लागलेला भीषण वनवा विझवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या २६ वन योद्ध्यांचा सत्कार

सिटी बेल । उलवे । मनोज पाटील ।

चिरनेर येथील अक्कादेवी कलम डोंगर परिसरांत लागलेला भीषण वनवा विझवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या २६ वन योद्ध्यांचा सन्मान गुरूवार दि.(२५) रोजी वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या वतीने साई देवस्थान साईनगर वहाळ येथे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

दरवर्षी उरण पूर्व विभागात असलेल्या वनसंपदेने नटलेल्या डोंगर परिसरांत या ना कारणावरून वनवे लागत असतात. हे वनवे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केला जातो .अशाच प्रकारचा वनवा नुकताच १३ मार्च रोजी चिरनेर येथील अक्कादेवी कलम परिसरात लागला होता.

हा लागलेला वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न वनविभाग कर्मचारी , निसर्ग वन्यजिव संरक्षण संस्था व महाराष्ट्र हरित सेनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी केला होता. त्या बद्दल त्या कर्मचारी व पदाधिकारी यांना वन मॅन योद्धा सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
या वेळी कामगार नेते इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत , साई देवस्थानचे संस्थापक रविशेठ पाटील ,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक मनोज पाटील ,पनवेल वनविभागाचे संजय पाटील , माजी सैनिक निलेश म्हात्रे ,रोटरी क्लब उलवे नोडचे अध्यक्ष शिरीष कडू ,जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनिल ठाकूर , विवेक केणी ,रायगड समालोचक असोशिएशन दिनेश पाटील , वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, प्रशांत पवार, उपाध्यक्ष नंदेश ठाकूर, सचिव सागर मढवी, हेमल मढवी आदि मान्यवर उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.