गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खंडणी वसुली कारभाराचा पनवेलमध्ये जाहीर निषेध ! राजिनामा आणि सखोल चौकशीची मागणी
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । हरेश साठे ।
दरमहा १०० कोटी रुपये खंडणी वसुलीचे पोलिसांना टार्गेट देऊन महाराष्ट्राला आणि पोलिसांच्या कर्तृत्वाला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पनवेल भाजपच्यावतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजिनामा घ्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.
पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार, माजी नगरसेविका निता माळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके, चंद्रकांत मंजुळे, थवई, राखी पिंपळे, प्रविण खंडागळे, शिवाजी भगत, प्रसाद हनुमंते, चिन्मय समेळ, विश्वजित पाटील, शाहवेज रिझवी, महेंद्र गोजे, सोनाली सावंत, लक्ष्मी चव्हाण, गौरी पवार, शोभा पन्हाळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी ‘महाराष्ट्रातील पोलिसांना बदनाम करणाऱ्या अनिल देशमुखांचा धिक्कार असो’, ‘महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो’, ‘वसुली महाआघाडी सरकारचा निषेध असो’, ‘तीन तिघाडा काम बिघाडा’, ‘महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार’, अशा गगनभेदी घोषणा देत गृहमंत्री अनिल देशमुख व महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला.राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराची लक्तरे आता परमबीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’मुळे वेशीवर मांडली जात आहेत.

अॅन्टिलिया स्फोटक तपासावरुन सुरु झालेले हे प्रकरण नंतर मनसुख हिरेन, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखयांच्यापर्यंत पोहचले आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. असे असतानाही अद्याप ठाकरे सरकार निद्रास्त अवस्थेत राहिला आहे.
धनंजय मुंडे, संजय राठोड या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांच्या बाबतीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही, त्यामुळे राज्यात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. राज्याच्या वैभवशाली परंपरेला काळीमा लावण्याचे काम होत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजिनामा घ्यावा, तसेच सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.








Be First to Comment