Press "Enter" to skip to content

कायदेतज्ञ अ‌ॅड.डी.के.पाटील यांचा सिडकोला कायदेशीर धक्का

सिडकोची अब्रु टांगली वेशीला : अलिबाग येथील मा.दिवाणी न्यायलय व स्तर यांचा सिडकोची जंगम संपतीवर जप्तीचे आदेश

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई सारख्या शहराला पर्याय शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्यासाठी सन.१९६८ पुर्वी एका नियोजन मंडळाची स्थापना केली.

या मंडळाने १९६८ साली केलेल्या शिफारशी राज्य शासनाने स्विकारून ठाणे-रायगड जिल्ह्या मधिल उरण- पनवेल- ठाणे परिसरातील एकूण ९५ गावा गावातील जमिनीच्या क्षेत्राचा समावेश करून नवीमुंबई नावाचे जुळे शहर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या करिता भूसंपादन अधिनियम १८८४ अन्वये ०३ फेब्रुवारी १९७० रोजी अधीसुचना जारी करण्यात आली या जमिनी संपादना मध्ये ठाणे तालुक्यातील २९ गावे, पनवेल तालुक्यातील ३८ गावे व उरण तालुक्यातील २८ गावांचा समावेश करण्यात आला असून नव्या मुंबई क्षेत्र ३४४ चौरस मिटर संपादीत करण्यात आला असताना शासनाने जबरदस्तीने बळाचा वापर करून येथील पिकत्या जमीनी कवडीमोल भावाने संपादन कल्या.

त्यावेळी येथील शेतक-याना विकासासह नोकरी-धद्याची गोड अमिषे दाखवून एकरी २२५००/- हजार नाममात्र भाव देऊन इथल्या कष्टकरी शेतक-याना देशोधडीला लावण्याचे काम शासना तर्फे सिडकोने शिताफीने केले.पण या अ‌न्यायकारक कायद्याच्या विरोधात उरण येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले कै.के.आर.पाटील यांचे सुपुत्र अ‌ॅड. डी.के.पाटील यांनी आपले मुंबई येथील वकिलीचा शिक्षण पुर्ण करून कै.के.आर.पाटील यांच्या आदेशानुसार उरण मधील शेतक-यांवर शासनातर्फे सिडकोकडून होणा-या अन्याया विरूद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच कायदेशीर आणि आपल्या वकिली शिक्षणाचा फायदा आपल्या जन्म भूमितील शेतकरी-कष्टकरी जनतेला व्हावा म्हणून आपल्या वडीलांच्या आदेशानुसार उरण मध्ये येऊन वकिली चालू करून त्यावेळी कोणीही शेतकरी या अन्याया विरोधात आणि वाढीव मोबदला शासनाकडून मिळावा म्हणून अनेक बैठका घेऊन सुद्धा शासनाच्या विरूध्द जाण्यास तयार नही हे पाहून उरण तालुक्यातील प्रथम मौजे भेंडखळ येथील स्वत: च्या वडलोपार्जीत जमीनीच्या वाढीव मोबदला शासनाकडून मिळावा म्हणून प्रथम LAR शासनाच्या विरोधात दाखल करून न्याय मिळवला.

नंतर उरण तालुक्यातील अनेक गावातील वाढीव मोबदल्याच्या केसेस जिकुंन येथील शेतक-याना न्याय दिला. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक १०/०३/२०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता उरण तालुक्यातील शेतकरी लिलाधर वामन भोईर तसेच दर्शना किरण शहा समवेत त्यांचे वकील अ‌ॅड. डी.के.पाटील तसेच अलिबाग येथील दिवाणी न्यायालय व स्तर बेलीफ यांच्या समवेत सिडको अधिकारी रविद्र गणेश कुलकर्णी यांच्या दालनात जप्तीची नोटीस घेऊन जाऊन खुर्ची,टेबल,पख्खे, कपाट,वातानुकूलित यंत्र,संगणक,इत्यादी सामनाच्या जप्तीची नोटीस बजावली असता आपण यावर विचारविनिमय करून काहीतरी मार्ग काढु असे सिडको अधिका-यांनी सागितले असता शेतकरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते हे पाहून शेवटी सिडको अधिकारी रविद्र गणेश कुलकर्णी यांनी वरील रकमेचे चेक परस्पर सदर मेट्रो सेंन्टर यांच्या नावे काढून रक्कम भरल्याची खात्री केली तेव्हाच वरील कार्यवाही तुर्तास थगित करण्यात आली.

या निर्णयाबद्दल शेत-यांनी समाधान व्यक्त केले असून सदर शेतक-यांनी त्यांचे वकील अ‌ॅड.डी.के.पाटील यांची भेट घेऊन आभार मानले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.