Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर मधमाश्यांचा हल्ला

अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्यामुळे उरण येथील द्रोणागिरी डोंगरावरून तीन इसम दरीत कोसळले

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

उरण द्रोणागिरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात ३जण दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्यावर पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

दुपारच्या सुमारास काही तरुण हे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर गेले होते. यावेळेस, त्यांच्या समवेत एक ६० वर्षीय गृहस्थ देखील होते. याचदरम्यान, डोंगराच्या वरच्या भागात असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने दोन तरुण आणि ज्येष्ठ गृहस्थ हे सैरावैरा पळू लागले यादरम्यान ८०० फूट दरीमध्ये या तिघांना खाली उतरावे लागले. यावेळी ३ जण गंभीर जखमी आणि मधमाशांच्या चावण्याने दुखापतग्रस्त झाले.

या घटनेची माहिती मिळताच नवपरिवर्तन संस्थेचे डॉ.सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील आणि विरेश मोडखरकर यांनी जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर घटनास्थळी उपचार केले. यानंतर ओएनजीसी, सीआयएसएफ जवानांच्या साहाय्याने तिघांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

यामध्ये, एका जखमी तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून ६० वर्षीय गणेश भोईर हे गंभीर जखमी झाले आहेत. वेळीच घटनास्थळी डोंगरावर जाऊन डॉक्टर सत्या ठाकरे व डॉक्टर घन:श्याम पाटील यांनी वेळीच उपचारात केल्याने या तीनही जणांचे प्राण वाचले आहेत. यानंतर जखमींना डोंगरावरून खाली आणल्यावर अँब्युलन्सद्वारे उरणमधील पालवी हॉस्पिटल येथे दाखल केले. जखमींचा धोका टळला असून प्रकृती उत्तम आहे.

2 Comments

  1. Laxman patil Laxman patil March 6, 2021

    Nice tips and mostly village news including so very nice ,reding news for village from raigad district.thanks.

  2. Laxman patil Laxman patil March 6, 2021

    Experience is good

Leave a Reply to Laxman patil Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.