सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।
नेहरु युवा केंद्र अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या रायगड जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गौरव सोहळा श्री. साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साई मंदिर साईनगर वहाळ येथे भक्तीमय वातारवणात संपन्न झाला.
यावेळी जेष्ठ कवी रायगड भूषण पुंडलिक म्हात्रे, आदर्श शिक्षक मो. का. मढवी गुरुजी, निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रेय कोळी गुरूजी, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, गणेश मढवी ईत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक विद्या किशोर संभेराव, द्वितीय क्रमांक चंद्रशेखर जगन्नाथ म्हात्रे तर तृतीय क्रमांक अभिषेक शोभा सुरेश पाटील यांनी पटकावले. तसेच ह्या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणुन कोमल पोपट हजारे, विशाखा रमेश देगाव आणि साहील प्रमोद थळे या स्पर्धकांची निवड झाली.
पाणी ह्या संकल्पनेवर आधारित विविध विषयांवर स्पर्धा घेत जिल्ह्यातुन ७० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व मान्यवरांचे आभार मनोज पाटील यांनी मानले. यावेळी रविशेठ पाटील यांनीही आयोजकांचे भरभरुन कौतुक करुन सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.








Be First to Comment