सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
शेकाप नवीन पनवेल पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सुनील वानखडे आयोजित माता रमाई आंबेडकर,राजमाता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीबाई फुले,यांची संयुक्त जयंती पंचशील नगर नवीन पनवेल येथे आयोजित केली होती.
यावेळी महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे पुत्र श्री.चंद्रकांत शिंदे यांचा भरदार गीतांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास शेकडो नागरिक उपस्थित राहून याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, पुरोगामी युवक संघटना जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, पुरोगामी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर, नगरसेविका सारिका भगत, शेकाप जिल्हा सह चिटणीस प्रभाकर कांबळे, सुकापूर ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा उभाले आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना गणेश कडू यांनी सांगितले की, सुनील वानखेडे हे शेकाप च्या माध्यमातून संयुक्त जयंती चांगली आयोजित केली असून आम्ही नेहमी शेकपक्ष झोपडपट्टी च्या आदी अडचणीला उभे राहू असे आश्वासन देऊन सर्व नागरिकांना रमाई आंबेडकर व सर्व मातांच्या संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सचिन आठवले, वैभव घोलप, किशोर जाधव, मिहिर कांबळे, तेजस कांबळे, शुभम सातपुते, मनोहर गवई, क्रांतीकारी बिट्स पनवेल,मॅजिक बॉईज ग्रुप कामोठे अजय मुजिकल ग्रुप गोवंडी जितू मुजीकल ग्रुप,पवन पुत्र ब्रास बँड मोठा खांदा पनवेल,साई आदर्श मुजिकाल ग्रुप चेंबूर,पनवेल बिट्स इ.मेहनत घेतली








Be First to Comment