नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित “संवाद व्यवस्थेशी”
“एक पाऊल… अपघात मुक्त समाजाकडे” याविषयावर घडणार परिसंवाद
सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई ।
३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२१ निमित्त नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद व्यवस्थेशी” या कार्यक्रमाअंतर्गत “एक पाऊल… अपघात मुक्त समाजाकडे” याविषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी, सकाळी ११.०० वा. स्थळ : विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी बस स्थानक जवळ, वाशी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या परिसंवादात बिपीन कुमार सिंह (पोलीस आयुक्त, नवी मुंबई), अभय देशपांडे (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल), डॉ. शुभदा नायक (प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी), अभिजित बांगर (आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका), अमोल खैर (परिवहन नियोजनकार व तज्ञ), डॉ. विकास देशमुख (मानसोपचार तज्ञ) हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
देशभरात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये लाखोंच्या संख्येने निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. परिणामी अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. अपघातांमधील मृतांमध्ये तरूणांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा जीव हा मोलाचा असल्याने भविष्यात अपघात मुक्त समाजाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने परिसंवादास उपस्थित मान्यवर व तज्ञांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपरोक्त कार्यक्रमास मित्र परिवारासह उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








Be First to Comment