शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या सळसळत्या व्याख्यानाने श्रोते मंञमुध्द
सिटी बेल लाइव्ह । उलवे ।
रोटरी क्लब ऑफ उलवे नोडव श्री साई देवस्थान साईनगर वहाळ,उलवे नोड नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साई संस्थान वहाळ व रवि पाटील सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक रविशेठ का. पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त “प्रतापगडचे युद्ध व श्री छत्रपती शिवरायांची युद्धनिती” या विषयावरील शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


शिवव्याख्यानाचे उद्घाटक म्हणून लीलाताई चव्हाण ( अध्यक्षा:- अखिल भारतीय भटक्या जमाती व विमुक्त जाती जमाती फेडरेशन,राष्ट्रीय महिला बंजारा प्रतिष्ठान ) उपस्थित होत्या.

श्री साई देवस्थान वहाळ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास शेकडो नागरिक उपस्थित होते तसेच विविध मान्यवरांनी यावेळी रविशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.












Be First to Comment