सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणेचे माजी सरपंच विलास चौलकर यांचे लहान बंधू राजेंद्र चौलकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्यकर्त्यांचे नेते कोकण विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी शनिवारी कै. राजेंद्र चौलकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चौलकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी विलास चौलकर, नारायण चौलकर, विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे,सखाराम ताडकर, युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, शहर अध्यक्ष दिनेश घाग, तुकाराम कदम, गुड्डु मोदी, मनोज टके, धृव सोष्टे, मनोज टके, चेतन टके, विध्यार्थी संघटना ता. अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, शहर अध्यक्ष केतन भोय, शंकर भालेकर, पंकज टके, बाळा टके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान गेल्या दोन दिवसापूर्वी आ. महेंद्र दळवी व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनीही चौलकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती.








Be First to Comment