सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे जवळील कडसुरे गावातील रहिवासी कुशीबाई यशवंत शिर्के यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रायगड जिल्हा चिटणीस आशाताई रंजन शिर्के यांच्या त्या सासूबाई होत. कै. कुशीबाई शिर्के यांच्या पश्चात पाच विवाहित मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
कै. कुशीबाई शिर्के यांचे दशक्रिया विधी रविवार दि. १४ फेब्रुवारी रोजी कडसुरे येथे व उत्तर कार्य बुधवार दि. १७ फेब्रुवारी रोजी कडसुरे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती आशाताई शिर्के यांनी दिली.








Be First to Comment