सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील गोडसई येथील हजरत बालेपीरबाबा यांच्या दर्ग्याचे पुजारी लियाकतबाबा मांडलेकर (वय ७१) यांचे दर्ग्या जवळील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. लियाकतबाबा यांच्या पश्चात पत्नी, दिलावर, अलिम हे दोन मुले, पाच मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नागोठणे येथील मुळ रहिवासी असलेले लियाकतबाबांचे कुटुंबीय हे गोडसई येथील जमीनदार होते. लियाकतबाबा व त्यांची आई श्रीमती खदिजाबीबी यांच्या स्वप्नात हजरत बालेपीरबाबांनी दर्शन देऊन त्यांची कबर गोडसई या ठिकाणी असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार खोपोली येथे टाटा कंपनीत नोकरी करीत असलेले लियाकतबाबांनी नोकरी सोडून आईच्या मार्गदर्शनाखाली गोडसई येथील हजरत बालेपीरबाबा यांच्या दर्गावर कायम स्वरूपी निवास करून ते दर्ग्याचे पुजारी झाले.
लियाकतबाबांच्या मार्गदर्शनाखाली गोडसई येथे गेले अनेक वर्ष हजरत बालेपीर बाबांचा उरूस साजरा केला जात होता. या उरुसाने जिल्ह्यातील नावाजलेला उरूस म्हणून ख्याती प्राप्त केली आहे. या उरुसात मुंबईसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध कव्वाल आणून कव्वालीचा कार्यक्रम साजरा केला जातो. या कव्वालीचा जिल्ह्यातील शेकडो कव्वाली प्रेमी आनंद घेत असतात. या उरुसा दरम्यान संदलच्या रात्री पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांना जेवण दिले जाते. लियाकतबाबांनी आपल्या अध्यात्म सिध्दीने हजारो भाविकांच्या अडचणी सोडविल्या आहेत. लियाकतबाबांची एक सिद्धी पुरुष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ख्याती होती.








Be First to Comment