सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
डायोसिस ऑफ बिलीवर्स ईस्टर्न ट्रस्टच्यावतीने रात्री थंडीमध्ये गारठणाऱ्या फुटपाथवासीयांना व उघड्यावर झोपणा-या बेघर कुटुंबांना उबदार ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी डायोसिस आॅफ बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी फुटपाथ व उघड्यावर ,रस्त्याकडेला झोपलेल्या बेघरांना शोधण्यासाठी रात्री प्रवास केला. यावेळी कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, जुने पनवेल आणि नवीन पनवेल जवळील रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि फुटपाथवरील बेघरांना त्यांनी ब्लँकेट्स दिले.

तर उघड्यावर झोपणा-या काहींच्या अंगावर ब्लॅकेट टाकले. या उबदार ब्लॅकेंटने फुटपाथ व उघड्यावर झोपणा-या बेघरांना दिलासा मिळाला असून या भेटवस्तूने रात्रीच्या थंड डिसेंबरमध्ये उबदार ब्लँकेट्स मिळाल्याने काहींनी समाधान व्यक्त केले.








Be First to Comment