रविशेठ पाटील यांच्या संकल्पनेतला “कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान” पुरस्कार सोहळा संपन्न
सिटी बेल लाइव्ह । वहाळ । सुनिल ठाकुर ।
जागतीक महामारी कोरोनाच्या काळात ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली असे पोलिस अधिकारी त्याच प्रमाणे डॉक्टर, नर्स, आशा सेविका यांना “कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान” पुरस्कार सोहळा साई देवस्थान साई नगर वहाळ व रोटरी च्या वतीने साई मंदिरात पार पडला .

यावेळी डॉ.बी.जी.शेखर पाटील (अतिरिक्त पो.आयुक्त नवी मुंबई ) यांच्या हस्ते कोरोना योद्धा रोटरी साई सन्मान पुरस्काराने कोरोना योध्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी रोटरियन सूरज भगत यांनी लिहिलेल्या “सक्सेस बुक” या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले.

यावेळी विनोद चव्हाण (सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई ), निवृत्ती कोल्हटकर (पो.निरिक्षक गुन्हे शाखा नवीमुंबई), रविंद्र पाटील (व.पो.नि.एन .आर .आय सागरी पो.ठाणे ), माधव इंगले (पो.उपनिरीक्षक एन .आर .आय. सागरी पो .ठाणे ), राजेंद्र धायटकर (मुख्य अभियंता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सिडको ) तसेच डॉ .अस्मिता बांबटकर (वैधकिय अधिकारी), संजय गावडे, प्रकाश म्हात्रे, सारिका म्हात्रे, रंजना दापोलकर, सीमा कोळी, राजश्री कांबळे, समिता पाटील, आशा कोळी, सुरक्षा ठाकुर, वर्षा कोळी, सारिका कोळी , संगीता पाटील, जयंती पुजारी, सुशिला कोळी, शुषमा पारिंगे, नम्रता भोईर, वंदना म्हात्रे आदी डॉक्टर.नर्स आशा सेविका आदिंना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी रविशेठ पाटील (संस्थापक अध्यक्ष साई देवस्थान वहाळ ), सौ.पार्वती ताई पाटील (मा.जि.प .सदस्या), सौ.माधुरी गोसावी, जगन शेठ पाटील, डी.के .पाटील, मो.का.मढवी, रायगड भूषण राजु मुंबईकर, गुरू कदम, निवेदक नितेश पंडीत, कवी पुंडलिक म्हात्रे, अरुण दपोलकर, जगदीश पारिंगे, शिरीष कडु (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ़ उलवे )आदी सह रोटरीयंन उलवे व साई भक्त मोठ्या संख्येने उपाथित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मो .का .मढवी तर सुत्रसंचालन नितश पंडीत यांनी करुन साई साई देवस्थान व रोटरी च्या वतीने देवस्थान चे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी आभार मानले.








Be First to Comment