नगरसेवक गोपाळ भगत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन : तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 65 रक्तदात्यानी केले रक्तदान, रुग्णाना फळांचे वाटप
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील ।
कळंंबोली शहर शेकापच्या वतीने कळंबोली शहर चिटणीस व नगरसेवक गोपाल भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात कोव्हिड 19 रुग्णांना मदत व्हावी म्हणून तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन नगरसेवक रविंद्र भगत, नगरसेेेविका प्रिया भोईर, युवा नेते संजय म्हात्रे यांनी आवाहन केले होते या कार्यक्रमाला तरुणानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 65 रक्तदात्यानी रक्तदान केले. या अभिष्टचिंतन दिनी एमजीएम, सुश्रुत हाँस्पिटल, एड्स हाँस्पिटलमधील 265 रुग्णाना फळांचे वाटप करण्यात आले. तर या वाढदिवसा परमशांती धाम अनाथ आश्रमातील मुलाना फळ वाटप करण्यात आली.

या शिबिराची सुरवात आमदार बाळाराम पाटील. पालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक रविंद्र भगत, नगरसेविका प्रिया भोईर, नगरसेविका कमळ कदम, शेकापचे गणेश कडू यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाली. कोरोना महामारीत रुग्णाना रक्तांची कमतरता भासत असून अनेकांना जीव गमवावा लागला.
या महाभयानक कोरोना संकटात कोणाचाही जीव गमावण्याची वेळ येवू नये म्हणून ” रक्तदान एक जीवनदान ” या उक्तीप्रमाणे गोपाळ भगत व त्यांच्या सहकार्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्या दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरासाठी नवी मुंबई ब्लड बँकेचे निलेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले. यावेळी संजय सरगर, अमोल सातपुते, तुषार जाधव, सुरज शेफ, नंदू गुप्ता, अक्षय शेलार व दर्शन पाटील यांच्या प्रयत्नाने या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








Be First to Comment