सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
पत्रकार अधिस्वीकृती समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष,जेष्ठ पत्रकार मिलिंद अष्टिवकर यांचे वडील उद्योजक सिताराम जानू अष्टीवकर यांचे रवि.दि.६ डिसें. रोजी रोहे येथील निवासस्थानी वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
गेली ५० वर्षे सामाजिक बांधिलकी जपत पादत्राणांचा व्यवसाय करणारे उद्योजक सिताराम अष्टिवकर एक समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपाला आले होते.म्हणूनच आपल्या हयातीत त्यांनी आपला घर,परिवार व व्यवसाय सांभाळून समाजासाठी फार मोठे योगदान दिले होते.
मितभाषी,प्रेमळ व दानशूर व्रुत्तीचे उद्योजक सिताराम अष्टिवकर यांनी आपल्या हयातीत आपल्या परिवारालाही चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारित केले.तर त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ रोहा शाखेचे उपाध्यक्ष व जिल्हा चर्मकार समाजाचे उपाध्यक्ष तसेच रोहा तालुका चर्मकार समाजाचे तालुका अध्यक्ष आदी पदांवर काम केले.त्यांच्या दु:खद निधनाने सामाजिक बांधिलकी जपणारा एक सच्चा कार्यकर्ता निघून गेला असल्याची व समाजाचीही फार मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया समाजमनातून व्यक्त होत आहे.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
त्यांच्या पाश्चात मुलगा मुली सून तसेच नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी व उत्तरकार्य मंगळवार दि १५ डिसें.रोजी रोहा एस टी स्टँड समोरील निवस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून प्राप्त झाली आहे.








Be First to Comment