नगरसेवक रविंद्र भगत, गोपाळ भगत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली ।
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार असल्यामुळे आज शेतकऱ्यांसह इतर घटकांनी शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडले आहे.

या शेतकरी विधेयक या कायद्याला विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद मद्ये आता पनवेल कर सुद्धा सामील झाले असून महाविकास आघाडी आणि शेकाप च्या माध्यमातून आज कळंबोली येथे नगरसेवक रविंद्र भगत, नगरसेवक गोपाळ भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.








Be First to Comment