सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची धरणे आंदोलने सुरु आहेत शेतकरी आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त करणारी तीन विधेयकं केंद्र सरकारने दडपशाहीने मंजूर करून घेतली आहेत. या विधेयकांच्या विरोधात आज देशभर भारत बंदची हाक देण्यात आली होती.
रायगड छात्रभारती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने भारत बंदला समर्थन करत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि हे शेतकरी विरोधी विधेयक मागे घ्यावे या मागणीचे निवेदन पनवेल तहसीलदार यांच्या द्वारे राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले.
याप्रसंगी छात्रभारती रायगड अध्यक्ष जितेश किर्दकुडे, पनवेल तालुका समन्वयक सागर गायकवाड, पदाधिकारी वैष्णवी गंगावणे, प्रफुल घरत उपस्थित होते.








Be First to Comment