महा विकास आघाडीची पनवेलचा शिवाजी चौकात जोरदार निदर्शने : पनवेल बंद शंभर टक्के यशस्वी
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आज संपूर्ण देशभरात बंदची हाक दिली गेली आहे. हा बंद आज पनवेलमध्ये शंभर टक्के यशस्वी झाला. शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडी तर्फे पनवेलच्या शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा सल्लागार तथा लोकनेते दि बा पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा प्रमुख शिरिष घरत, काँग्रेस नेते सुदाम पाटील, कॉम्रेड कृष्णा भोयर, समाजसेविका उल्का महाजन,नगरसेवीका सुरेखा मोहकर, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, जिल्हा सहचिटणीस आर डी घरत, जिल्हा सहचिटणीस शंकरशेठ म्हात्रे, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, माजी नगरसेविका शशिकला सिंह, निर्मला म्हात्रे आदींसह महाविकासआघाडी घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment