सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील बाहे गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक ह.भ.प. नारायण सहादेव जाधव यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दु:खद निधन झाले.
सामाजिक कार्याचा वसा घेऊन तरूणपणापासूनच सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी करणारे क्रुषीनिष्ठ शेतकरी तथा माजी सरपंच नारायण जाधव यांच्या दु:खद निधनाने समाजाची फार मोठी हानी झाली असल्याची भावना समाजमनातून व्यक्त होऊ लागली आहे. आपल्या हयातीत आपले कुटुंब,गाव व समाजासाठी त्यांनी नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका निभावली.तर विभागातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले योगदान दिले तर राजकीय द्रुष्ट्या कार्य करीत असताना ग्रा.पंचायतमध्येही सरपंच म्हणून काम करताना कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांना समान न्याय देऊन कार्य तर केलेच याशिवाय विविध विकासाच्या योजनाही त्यांनी आपल्या ग्रा.पंचायतीमध्ये राबविल्या.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र. दि.११ डिसें.तर अंतिम धार्मिकविधी रवि. दि.१३ डिसें. रोजी बाहे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment