8 डिसेंबर च्या संपाबाबत नियोजन
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
दि.८.१२.२०२० रोजी देशातील सर्व शेतकरी सघंटनानी भारत बंदची हाक दिलेली आहे.भारत बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय देशातील प्रमुख १० केंद्रीय कामगार सघंटना व स्वतंत्र फेडरेशन तसेच विविध राजकीय विरोधी पक्षाचे घेतलेला आहे.भारत बंद मध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी शिनसेना, काॕग्रेस,राष्ट्रवादी काॕग्रेस पक्ष तसेच डाव्ये पक्ष सुध्दा सहभागी होणार आहे. कामगार सघंटना सयुंक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) महाराष्ट्रभर बंद मध्ये सहभागी होवुन निदर्शने करणार आहे.रायगड जिल्हा सुध्दा बंद व्यसस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा कामगार सघंटना सयुंक्त कृती समितीची आॕनलाईन बैठक दि.७.१२.२०२० रोजी दुपारी ४.०० वाजता गुगुल मिट अॕपवर झाली.
बैठकीस कामगार नेते मा.महेद्रं घरत (इटंक),काॕ.कृष्णा भोयर,काॕ.भुषण पाटील (सिआयटियु), काॕ.उल्का महाजन(कष्टकरी नेत्या), काॕ.कृष्णा भोयर(आयटक), काॕ.देशपाडे (शेकाप कामगार सघंटना), काॕ.अॕड.जोहेकर (आयटक),काॕ.सौ.भांरती भोयर (आयटक) व श्री.वैभव पाटील( इटंक) सहभागी झालेले होते.
बैठकीत झालेले निर्णय :-
१) उरण शहरात सकाळी ११.०० मोर्चा काढण्यात येईल.त्यात कामगार सघंटना पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे.
२) पनवेल येथे सत्ताधारी पक्ष शिवसेना,काॕग्रेस,राष्ट्रवादी काॕग्रेस व शेकाप इत्यादी पक्ष सकाळी ८.०० शिवाजी पुतळा,पनवेल येथुन मोटार सायकल रॕली काढून कळबोली, पनवेल,खारघर व नविन पनवेल बंदचे आवाहन काढून बंद करणार आहे.कामगार सघंटना पदाधिकारी व सभासद यांनी सकाळी ८.०० वाजता शिवाजी पुतळा पनवेल येथे जमावे.
३) कर्जत मधिल कामगार सघंटना पदाधिकारी तहसिलदार कर्जत याना सकाळी ११.०० वाजता एकञ जावुन निवेदन देणार.
४) अलिबाग येथे जिल्हाधिकारी याना कामगार सघंटना पदाधिकारी निवेदन देणार.व सत्ताधारी पक्षाचे आयोजित बंद मध्ये सहभागी होणार.
५) इतर तालुक्यात सत्ताधारी पक्षाचे आयोजित केलेल्या आदोंलनात कामगार सघंटनानी भागिदारी करावी.







Be First to Comment