सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
उलवे मधील गोरक्षनाथ मंदिर व साई मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची फार दुरावस्था झाली होती जाता येता खूप त्रास होत होता हे श्री गोरक्षनाथ मंदिर विश्वस्त मंडळ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई संचालक
राजेंद्र पाटील यांच्या निदर्शनात आणून दिली असता. त्यानी त्याचाताबडतोब पाठ पुरावा करून जे.कुमार आणी कंपनी यांच्याशी संपर्क करून तो रस्ता एका दिवसात बनवून घेतला.
रस्ता पुर्ण करुन त्रासा पासुन सुटका केल्या बद्ल कृ.ऊ.बा .स.सभापती राजेंद्र पाटील व जे.कुमार आणी कंपनी यानी तात्काळ काम करून दिल्या बद्दल
मिलिंद रमेश पाटील संस्थापक अध्यक्ष
श्री गोरक्षनाथ मंदिर वहाळ तसेच परिसरातील लोकानी त्यांचे अभिनंदन केले आहे .








Be First to Comment