सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील वरसे गावचे रहिवासी तथा रोहा पंचायत समितीचे माजी सभापती हेमंत विठ्ठल कांबळे यांच्या मातोश्री रुक्मिणी ( गौरीबाई) विठ्ठल कांबळे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
अतिशय प्रेमळ शांत मन मिळवू स्वभावाच्या असल्याने सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या तसेच सामाजिक,अध्यात्मिक व धार्मिक कार्याची विशेष आवड असणाऱ्या गौरी बाई कांबळे या सर्व आप्तस्वकीय, सगे – सोयरे परिवार यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या.
त्यांच्या अंत्यविधी समयी राजकीय, अध्यात्मिक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या सांत्वन पर भेटी करिता रायगड जिल्हा पालक मंत्री कु.अदिती ताई तटकरे,विधान परिषदेचे सदस्य आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष व रायगड जिल्हा कबड्डी असोसिशनचे विजय मोरे,रोहा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विनोद भाऊ पाशिलकर, माजी उपसभापती अनिल भगत,सरपंच सौ. मीना ताई म्हात्रे,रामशेठ म्हात्रे, उपसरपंच अमित मोहिते,बिल्डर रामा नाकती,आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी आणि अंतिम धार्मिक विधी बारावे मंगळवार दि.०८/१२/२ ०२० राहत्या घरी वरसे श्री. दिनेश कांबळे यांच्या निवासस्थानी होतील असे त्यांच्या निकवर्तीयांनी सांगितले आहे..








Be First to Comment