पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अभ्यास दौरा अध्यक्षपदी केवल महाडिक यांची एकमताने निवड
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पनवेल तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनांची फादर बॉडी म्हणून ओळखली जाणारी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती नेहमीच पत्रकार एकजुटीच्या साठी सातत्याने झटत आलेली आहे. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच रत्नाकर पाटील यांची निवड झाल्याने नवीन कार्यकारणी कार्यान्वित झालेली आहे. नवनिर्वाचित समितीच्या नियोजनानुसार पनवेल तालुका संघर्ष समिती लवकरच अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सदरच्या अभ्यास दौऱ्यासाठी यंग डायनामिक आणि डॅशिंग पत्रकार केवल महाडिक यांची अभ्यास दौराअध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली.
पनवेल तालुका पत्रकार संघाच्या समितीचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील आणि सुनील दादा पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तर रत्नाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम मासिक सभा आज शनिवार दिनांक 5 डिसेंबर रोजी संपन्न झाली.
या सभेमध्ये पत्रकार दिन साजरा करणे, अभ्यास दौरा आयोजन करणे,आणी सामाजिक उपक्रम राबविणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
अभ्यास दौरा अध्यक्ष पदासाठी निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केवल महाडिक म्हणाले की, कोविडमुळे जारी करण्यात आलेल्या संचार बंदी च्या वेळी संघर्ष समितीमधील प्रत्येक सदस्याने मनापासून आपले योगदान दिलेले आहे. तहान-भूक वेळ आणि स्वतःचे आरोग्य याबाबत कुठलाही विचार न करता कोरॉना बाधितांना सहाय्य मिळवून देण्यासाठी पनवेल तालुका संघर्ष समिती कार्यमग्न होती. याच दरम्यान गरीब गरजू उपेक्षित आणि दुर्गम विभागातील आदिवासी बांधव यांच्यासाठी जीवनावश्यक जिन्नस आणि रेशन साहित्य पुरवण्याचे काम देखील आमचे सदस्य करत होते. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करणाऱ्या आमच्या सदस्यांना विरंगुळा म्हणून आणि श्रमपरिहार म्हणून देखील या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करत आहोत. जे जे उत्तम उदात्त ते ते घेत जावे हाच समितीचा नेहमी ध्यास राहिला आहे. त्यानुसार सर्व सदस्यांच्या सहकार्याने यंदाचे वर्षी चा अभ्यास दौरा देखील तितकाच माहितीपूर्ण आणि प्रत्येक सदस्याला नवीन अनुभव देणारा असेल असा विश्वास मी व्यक्त करतो.
शनिवारी संपन्न झालेल्या मासिक सभेसाठी अध्यक्ष, अभ्यास दौरा अध्यक्ष व सल्लागार यांच्या जोडीने कार्याध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस रवींद्र गायकवाड, खजिनदार हरीश साठे ,सहखजिनदार अनिल कुरघोडे,सह सरचिटणीस सुधीर पाटील, मंदार दोंदे, विवेक पाटील, माजी अध्यक्ष निलेश सोनावणे, भालचंद्र जुमलेदार, मयूर तांबडे, दीपक महाडिक, अरविंद पोद्दार, वचन गायकवाड,संतोष भगत,अनिल भोळे आदी सदस्य उपस्थित होते.
केवल महाडिक यांनी यापूर्वी देखील यशस्वीपणे राजस्थान आणि हैदराबाद या ठिकाणी अभ्यास दौरा आयोजित करून पत्रकारांना दोन राज्यांतील पत्रकारिते बाबत महत्वपूर्ण माहिती मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या धडाडी पूर्ण कार्यपद्धतीवर व परिपूर्ण नियोजनावर समितीतील प्रत्येक सदस्याचा विश्वास असल्याचे मत सल्लागारांनी व्यक्त केले.








Be First to Comment