पनवेलमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठींबा दर्शवून विविध ठिकाणी धरणे आंदोलन केले आहे. पनवेलमधील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने एकत्र येवून केंद्र सरकारचा निषेध केला.
सरकारकडून अमानुषपणे शेतकऱ्याचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारला दखल घ्यावीच लागेल असा सूरही आंदोलकांनी धरला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावर केंद्र सरकारची पिछेहाट पाहून संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात कायद्यांमध्ये बदल झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणे गरजेचे आहेत, असा नारा आता पनवेलसह संपूर्ण देशभरातील जनता बोलत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे गांभीर्य ओळखून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये पनवेल शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील,भरत म्हात्रे, महादेव कटेकर, हेमराज म्हात्रे, श्रीरंग कमलाहसन, विश्वजित पाटील, राजेश घरत, लतीफ शेख, कॅप्टन कलावत, विजय केणी, जयवंत देशमुख,कपिल यादव,नदीम नालखंडे, अरुण ठाकूर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment