सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहा तालुक्यातील रेवोली येथिल कुणबी समाजाचे जेष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते तथा रोहा तालुका कोतवाल संघटनेचे सदस्य राजेश काशिद यांचे वडील मेढा तलाठी सजाचे सेवानिवृत्त कोतवाल दगडू काशिद यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.
त्यांचा स्वभाव शांत, मनमिळावू, परोपकारी, दानशूर सेवभावी वृत्तीचा होता. त्यांना सामाजिक कार्या बरोबर धार्मिक, भजन उत्सवात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा तसेच ते शेती निष्ठ शेतकरी होते. त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली होती पश्चात तीन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे व मोठा काशिद परिवार आहे. त्यांचे दशक्रीया विधी शुक्रवार दिनांक 09 डिसेंबर 2020 मेढा येथे स्वयंभू वाकेश्वर तलाव येथे तर उत्तरकार्य दिनांक 10 डिसेंबर रोजी रेवोली येथे असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र राजेश काशिद यांनी दिली.
कोतवाल यांच्या अंत्ययात्रेसाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचे, विविध समाजाचे नेतेगण, आजी माजी सभापती तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तलाठी संघटनेचे पदाधिकारी व महसूल अधिकारी, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.








Be First to Comment