एन एम एस ई झेड च्या कार्यालया समोरील रस्ता केला बाईक स्वारांनी गिळंकृत !!!
सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । अजित पाटील ।
सिडकोच्या उरण भागातील अनेक रस्त्यांवर वाहनचालकांची खुलेआम दादागिरी सुरू आहे. यातूनच रस्त्याच्या कडेला लावल्या जाणाऱ्या अनधिकृत वाहनांमुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत मात्र त्यानंतरही यंत्रणा सुधारण्याचे नावही घेत नसल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. उरणच्या नवघर गाव हद्दीत असलेल्या रिलायन्स एन एम एस ई झेड कार्यालयाच्या समोर असणारा सिडकोच्या रस्त्यावर या कार्यालयात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी स्वारांनी कब्जा केला असल्याने सामान्य नागरिकांनी या मार्गावरून प्रवास तरी कसा करायचा असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
या कार्यालयात काही ठराविक गाड्यांनाच थांबा असल्याने बाकीच्या सर्व गाड्या सुरक्षा रक्षक कार्यालयाच्या आवारात आणण्यास बंधन घालत असल्याने कामा निमित्ताने या ठिकाणी येणारे दुचाकी स्वार आपल्या गाड्या थेट सिडकोच्या रस्त्यावर बेधडकपणे पार्क करीत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
उरण तालुक्यात सिडकोला कोणी मायबाप नासल्यागत स्थिती आहे . येथील अनेक रस्त्यांच्या कडेला अगदी रोज नव्याने टपऱ्या , पंक्चरची दुकाने अगदी बेधडकपणे टाकली जात असतानाच काही काही रस्ते बेधडकपणे गिळंकृत केले जात असताना सिडकोच्या अधिकारी वर्गाचा मात्र गांधारी झाल्याचे जाणवत आहे . सिडको अधिकारी आमच्याकडे कोणाची तक्रार नाही , आम्हाला माहीतच नाही अशी तकलादू कारणे देत अशा अनधिकृत अस्थापनांना एकप्रकारे आतून सहकार्याची भूमिका तर घेत नाहीत ना असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
सिडकोच्या अधिकृत पार्किंगवर गाड्या कमी मात्र अनधिकृत पार्किंगवर मोठ्या प्रमाणात गाड्या लागत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील नवघरच्या एन एम एस ई झेड कार्यालयासमोरील सिडकोच्या रस्त्यावर सेझ कार्यालयात कामा निमित्ताने येणाऱ्या दुचाकी स्वारांनी मागील काही दिवसांपासून अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे या ठिकाणच्या रस्त्याची एक मार्गिका दोन्ही बाजूने अनधिकृत दुचाकी पार्किंग करून ठेवली जात असल्याने या मार्गावरून पुढे भागूबाई शाळेत किंवा जे एन पी टी टावूनशीप गेटवर जाऊ पाहणाऱ्या इतर वाहन चालकांना मात्र कसरत करावी लागत आहे .

बेधडक पणे रस्त्यावर गाड्या पार्क करण्यासाठी एन एम एस ई झेड कार्यालयाचे सुरक्षा राक्षकच उकसवत असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे त्यामुळे हा रस्ता नक्की सिडकोचा की एन एम एस ई झेड वाल्यांच्या बापाचा असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे .








Be First to Comment