सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार ।
उरण तालुकयातील चिर्ले गावातील सुनील पाटील यांच्या घराच्या टेरेसवर असणार्या जाळ्यात एक धिवर पक्षी अडकला होता. आपल्या सुटकेसाठी धडपडणार्या धिवर पक्ष्याची प्राणीमित्र आनंद मढवी व प्राणीमित्र पंकज घरत यांनी त्याच्या भोवताली असलेला जाळ्याचा गूंता सोडवून सुटका केली.
खंड्या किंवा किंगफिशर या नावाने ओळखर्या धिवर पक्षाचे प्रमूख खाद्य मासे आहेत. म्हणून हा पक्षी नद्या, तलाव, खड्डे खाडी या भागात जास्त प्रमाणात आढळतो.या प्रजातीतील काही पक्षी आकाराने चिमणी एवढे तर काही मोठे असतात.
खाद्याच्या शोधात घराच्या टेरेस वर आलेला हा पक्षी अलगद जाळ्यात आडकला होता परंतू सुनील पाटील ,आनंद मढवी व पंकज घरत यांच्या पक्षी प्रेमामूळे त्याचे प्राण वाचले








Be First to Comment