सिटी बेल लाइव्ह । स्वप्नील भोवड । 🔷🔶🔷🔶
आज पुन्हा एकदा दुर्गमावळा प्रतिष्ठान नवीमुंबई विभागा तर्फे द्रोणागिरी गडावर शोध मोहीम घेण्यात आली आणि मोहिमेसाठी १० मावळे सज्य झाले. तीन तासाच्या कसरती नंतर त्यांना एक दगडात कोरलेली प्राचीन खोली (रूम) शोधण्यात यश आले आणी त्या खोलीत (रूम मध्ये ) दगडी बांधकाम केलेला एक ३×४×२ फुटाचा खड्डा सापडला.

तो खड्डा पूर्ण माती ने आणि दगडाने पूर्ण पणे ढाकला गेला होता त्या खड्ड्या तील माती आणि दगड पूर्ण साफ केले असता जे काही आम्हाला सापडले ते पाहून हे मावळे खूप हैरान झाले. त्या खड्ड्या खाली एक दगडी झाकण सापडला त्यांनी तो झाकण काढला असता झाकणा खाली पाण्याचा एक जिवंत टाका त्यांना सापडला.

त्या टाक्यामधी पाणी हे पिण्यालायक होते. आज ची शोध मोहीम खूप कसरतीची होती पण जेव्हा या मावळ्यांना ही वास्तू सापडली तेव्हा त्यांचा पूर्ण थकवा नाहीसा झाला आणि सर्व मावळ्यांमदे पुन्हा एक जोश निर्माण झाला.








Be First to Comment