सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷🔶
खालापूर तालुक्यातील आसरोटी येथील गंगाबाई राघो ठोंबरे (वय ८१) यांचे रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात सकाळी ८.४० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
आसरोटी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कार वेळी गावातील मंडळी,वारकरी संप्रदायातील, राजकीय,सामाजिक तथा नातेवाईक उपस्थित होते. गंगाबाई त्यांच्या पश्चात पाच मुले पांडुरंग, प्रकाश, जयराम,गजानन आणि रोहिदास यांच्यासह पुतणे, सुना,जावई,नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.
खालापूर तालुक्यातील पत्रकार तथा रोहिदास कोचिंग क्लासेस चे संस्थापक तथा शिवकार्य ट्रेकर्स चे संस्थापक रोहिदास ठोंबरे यांच्या त्या मातोश्री होत्या.अत्यंत कुटुंबवत्सल असलेल्या गंगाबाई यांना सर्वजण धाकली आदरार्थी नावाने संबोधत असत.त्यांच्या हसमुख आणि प्रेमळ स्वभावाकारणाने पंचक्रोशीत त्या सर्वांच्या आवडत्या होत्या.
सुरुवातीपासून वारकरी असल्याने त्यांची आळंदी व पंढरपूर नित्य नियमाने आपल्या पतीबरोबर वारी असायची. त्यांचं संपूर्ण जीवन आध्यात्मिक क्षेत्रात गेले आहे.परिसरातील अनेक गावांत किर्तनरुपी श्रवणाला आवर्जून त्या हजर असायच्या.महंत ह.भ.प.आनंद महाराज खंडागळे त्यांचे गुरुवर्य होते.








Be First to Comment