Press "Enter" to skip to content

पञकार संजय कदम यांचा रोटरी क्लब कडून सन्मान

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔷🔶🔶

दै. सामनाचे पनवेल प्रतिनिधी तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चे कार्याध्यक्ष संजय चं. कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या तर्फे कोव्हिडच्या महामारीत देखील व्यक्तिगत हितापेक्षा उच्च सेवा हे रोटरीचे ब्रीद प्रत्यक्ष आचरणात आणून समाजाची सेवा केल्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी रोटरी मेंबरशिप डायरेक्टर मंजू फडके, डिआरएफसी रो. डॉ. गिरीश गुणे, डिस्ट्रीक्ट चेअर आरसीसी रो. अनंत टिकोने, अध्यक्ष रो. रुपेश यादव, सचिव रो. बाळकृष्ण आंबेकर आदी उपस्थित होते.

संजय कदम हे कोव्हीड महामारीत एकही दिवस घरी बसले नाहीत. ते सातत्याने वृत्तसंकलन करीत होते. त्याचप्रमाणे कोव्हीड रूग्णांना अनेक प्रकारे मदत करीत होते. रूग्णांना रूग्णालय मिळवून देणे, क्वारंटाइन बाबत मार्गदर्शन करणे, रूग्णांची हाॅस्पीटल ची बिले कमी करणे आदींमध्ये ते सक्रिय होते. या दरम्यान ते स्वतः कोरोनाग्रस्त झाले. परंतु ते डगमगले नाहीत. रुग्णालयातून घरी परतताचं ते पुन्हा नव्याने सेवेत रुजू झाले.

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे करण्यात आलेला हा माझा सन्मान मी समस्त पत्रकारांचा सन्मान समजतो. आम्ही पञकारांनी केलेल्या कार्याची दखल आपण घेतलीत आणि मला समाजाची आणखी जोमाने सेवा करण्याची प्रेरणा दिलीत त्याबद्दल मी सर्व रोटरियन चे आभार मानतो. 

संजय कदम, ज्येष्ठ पत्रकार

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.