त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी केले दीपदान : हजारो दिव्यांनी उजळले आसमंत 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । श्रीनिवास काजरेकर । खांदा कॉलनी । 🔶🔶🔷🔷
त्रिपुरारी पौर्णिमेची पर्वणी साधून खांदा कॉलनीतील पुरातन अशा खांदेश्वर मंदिरात दीपोत्सव संपन्न झाला. भाविकांकडून खांदेश्वर मंदिराच्या प्रांगणात, आजुबाजूच्या परिसरात तसेच तलावाच्या पायऱ्यांवर असंख्य दिवे लावण्यात आले. या दिव्यांनी आसमंत उजळून निघाला होता.
सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. खांदा कॉलनीतील “दीपसंध्या समूह” या संस्थेच्या वतीने परिसरात असंख्य दिवे लावण्यात आले. त्यानंतर दिपसंध्या समूहाच्या कलाकारांनी गाणी व अंताक्षरीचा कार्यक्रम संपन्न केला.
दीपसंध्या समूहाच्या प्रवर्तक छाया कुलकर्णी यांच्यासह, मेधा सदावर्ते, निलिमा अलकेरी, मुग्धा कुलकर्णी, वर्षा खेडकर, प्राची देशपांडे, सुचेता लुम्पातकी, पद्मजा कुलकर्णी, मेधा मैलूरकर, कोमल कुलकर्णी आदींनी यामधे सहभाग घेतला.











Be First to Comment