दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेल्या तरूणाने पुन्हा पाहीली सृष्टी : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टने केला ऑपरेशनचा संपूर्ण खर्च 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔷🔶🔶
एकटघर-जासई येथील रूपेश रामचंद्र म्हात्रे या तरुणाची गेलेली दृष्टी परत आणण्याचे काम शेकापचे युवानेते रमाकांत म्हात्रे यांनी केले आहे.
रुपेश म्हात्रे यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याने १ महिन्या पासून तो घराबाहेर पडू शकत नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने डॉक्टरकडे इलाज करणे शक्य नव्हते. ही घटना एकटघर येथील काही तरुणांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांच्या कानावर घालीत मदत करण्याची विनंती केली. रमाकांत म्हात्रे यांनी त्वरित जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांचेबरोबर चर्चा केली असता त्यांनी ऑपरेशनचा संपूर्ण खर्च आमच्या ट्रस्टतर्फे करण्याचे आश्वासन देऊन तसा चेक “साई कृपा दृष्टी आय हॉस्पिटल उरण” यांच्या नावे पाठवून दिला.

काल शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी रूपेश म्हात्रे यांचे डोळ्यांचे यशस्वी ऑपरेशन होऊन त्यांना सुखरूप घरी आणण्यात आले आहे. याकामी प्रकाश नाईक, समीर म्हात्रे आणि जासईचे गणेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. रुपेश म्हात्रे यांची गेलेली दृष्टी परत आणण्याचे काम शेकाप युवानेते रमाकांत म्हात्रे यांनी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








Be First to Comment