Press "Enter" to skip to content

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा महामोर्चा

जिल्हाध्यक्ष अतुल भगत व तालुका अध्यक्ष अविनाश पडवल यांचे नेतृत्व 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔷🔷

गेले आठ महिने जनता लॉकडाऊनमुळे घरीच अडकलेली असताना आणि आमदनी रूपयाचीही कमाईं नसताना राज्य सरकारने लोकांना लॉकडाऊन काळात आलेल्या विजबीलात कोणतीही सवलत मिळणार नाही हे जाहीर केले आणि महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला. लॉकडाऊन काळात लोकांसाठी रस्त्यावर उतरणा-या मनसेने याविरोधात एल्गार पुकारला आहे.२६ नोव्हेंबर रोजी राज्यभरातल्या जिल्हाधिकारी कार्यालये आणि प्रांत कार्यालयांवर महामोर्चे आयोजित केले.

याचाच भाग म्हणुन पनवेल मनसेनेही मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांच्या नेतृत्वाखाली, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीश सावंत, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण अक्षय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष पराग बालड, शितल शिलकर, प्रसाद परब, अमोल बोचरे, रोहित दुधवडकर, वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष राजकुमार पाटिल,प्रविण दळवी, राहुल चव्हाण, इतर सर्व मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि त्रस्त जनता यांच्या सहकार्याने प्रांत कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

प्रचंड पोलिस बंदोबस्त असताना निघालेला हा महामोर्चा पाहून तरी लोकांच्या भावना सरकार पर्यंत नक्कीच पोहोचतील आणि सरकार विज सवलतीचा विचार करेल अशी आशा याप्रसंगी पनवेल मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.