सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔷🔷
नागोठण्याजवळील वरवठणे गावातील तरुण नितीन मारुती पाटील (वय ३५) यांचे आज बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील हाॕस्पीटलमध्ये अल्पशा आजारावर उपचार घेत असतानाच उपचारा दरम्यान निधन झाले.
नितीन पाटील यांच्या निधनाने पाटील कुटूंबीय, ग्रामस्थ, मित्रपरिवार यांच्यात शोककळा पसरली असून ऐन तारुण्यात नितीन पाटील यांचे निधन झाल्यामुळे नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. नितीन पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक बहीण व दोन लहान मुले असा परिवार आहे.








Be First to Comment