महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याने उलवे नोड येथील रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । उरण । 🔷🔷🔶🔶
गेल्या काही महिन्यांपासून नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोड येथील रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. या समस्येकडे गांभीर्याने पाहत कामगार नेते महेंद्र घरत यांनी पुढाकार घेत ही समस्या मार्गी लावण्याचे काम केले आहे.
विमानतळ बाधित उलवे, तरघर कोंबडभुजे, गणेशपूरी, वाघीवली या गावांचे पूर्नवसन सेक्टर २५/२६ उलवे नोड पुष्पक नगर नोड ३ मधे केले आहे. तेथे मोठया प्रमाणात इमारतींचे काम प्रगती पथावर आहे. त्यामुळे तेथे रस्त्याची अवस्था दयनिय आहे. यासंदर्भात कामगार नेते महेंद्र घरत यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. डायटकर व मुख्य अभियंता सिडको, उलवे नोड श्री. गोडबोले यांची भेट घेवुन रस्त्यांची दुरूस्ती तातडीने करण्यासाठी निवेदन दिले होते.

दोनही अभियंत्यांनी तातडीने दखल घेवुन दुसर्याच दिवशी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. तेथील नागरीकांनी महेंद्र घरत यांच्या कार्यतत्परतेमुळे दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.








Be First to Comment