Press "Enter" to skip to content

वावंजे ग्रामपंचायतीला लाभले उच्चशिक्षित उपसरपंच

वावंजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी देवचंद दत्ताञेय पाटील यांची बिनविरोध निवड 🔷🔷🔷🔷

काशिनाथ पाटील यांच्या उपस्थितीत स्विकारला पदभार 🔶🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । तळोजा । वचन गायकवाड । 🔶🔶🔷🔷

पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी देवचंद दत्ताञेय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वावंजे ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच चंदना चंद्रकांत पाटील यांच्याकडून नवनिर्वाचित उपसरपंच देवचंद दत्ताञेय पाटील यांनी आज पंचायत समितीचे मा. सभापती व विद्यमान सदस्य काशिनाथ पाटील व सरपंच डी.बी.म्हाञे  यांच्या उपस्थित पदभार स्वीकारला.

देवचंद दत्ताञेय पाटील हे उच्चशिक्षित असून त्यांच शिक्षण बी.काॅम पर्यत झाले आहे.

वावंजे ग्रामपंचायतीचे सरपंच डी.बी. म्हाञे व मा. सभापती व विद्यमान सदस्य  काशिनाथ पाटील यांच्या हस्ते
गोपीनाथ मुंडे अपघाती योजना अंतग॔त कै. गणेश महादेव सांगडे यांच्या परिवाराला अपघाती विमा म्हणून दोन लाखाचा निधी देण्यात आले. यावेळी सरपंच डी. बी. म्हाञे यांनी गावातील ग्रामस्थांना आव्हान केले कि दुर्देवाने
कोणाचे हि अपघाती मुत्यू झाल्यास थेट ग्रामपंचायतीशी संपक॔ साधावा. त्यांच्या परिवारस या योजनेचा लाभ नक्कीच मिळवून देवू.

यावेळी काशिनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम मावळते उपसरपंच व नवनिर्वाचित उपसरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पुढे ते  म्हटले कि  स्वर्गीय आनंद पाटील व स्वर्गीय दत्तू मामा  यानी शेतकरी कामगार पक्षासाठी आयुष्यभर जी पताका  आपल्या खांद्यावर घेतली ती कधीच खाली उतरून दिली नाही. आज देवचंद दत्ताञेय पाटील यांच्या रूपाने या गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून होण्याची संधी तुम्ही लोकांनी त्यांना दिली. हि  खऱ्या अर्थाने दत्तू मामा यांना श्रद्धांजली ठरेल अशी आशा व्यक्त करतो.

मावळते उपसरपंच चंदना चंद्रकांत पाटील यांनी दहा महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय चांगला कारभार या गावासाठी केला आहे. आपल्या उपसरपंच पदाचा काय॔काळ संपल्या नंतर  देवचंद दत्ताञेय पाटील  यांना नव्याने संधी उपलब्ध करून देत पक्षाचा आदेश काय असतो. पक्षाचा आदेश सव॔ श्रेष्ठ असतो याचा आदश॔ सव॔ सदस्यासमोर ठेवला.

वावंजे  ग्रामपंचायतीचा जो विस्तार होतोय गावातील घनकचऱ्याचा  जो प्रश्न उपस्थित झाला आहे.तो सोडविण्यासाठी मुबंई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून वावंजे गावात घणकचरा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. लवकरच या गावात मुबंई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने घणकचरा संबंधी उपक्रम राबविला जाईल. घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे मा. सभापती व विद्यमान सदस्य काशिनाथ पाटील , कंळबोली महिला  आघीडीचे प्रमुख सरस्वती काथारा, युवा काय॔कते पराग भोपी , तसेच ग्रामपंचायत सदस्य चंदना चंद्रकांत पाटील माजी उपसरपंच, जीनेश मापा  पाटील,  कांचन विकास पाटिल, संगीता फुलोरे, आनंदी कातकरी,  पूनम धोगडें, अरूण कातकरी, वावंजे गावातील ग्रामस्थ मच्छिद्र पाटील, ज्ञानदेव पवार, चंद्रकांत पाटील, गोपीनाथ पाटील, सिताराम पाटील, महम्मद युसूफ शेख, मुक्ता शेख , मोहन शेळके, यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.