सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔷🔷
नागोठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागोठण्यातील तेली समाजाचे नेतृत्व महादेव धोंडिबा इप्ते (वय ६०) यांचे रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास वयाच्या ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यामुळे नागोठण्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. महादेव इप्ते हे मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी पूर्वी ट्रक वाहतूक व विटभट्टीचा व्यवसाय केला होता. सध्या ते घरगुती दूध विक्रीचा व्यवसाय करीत होते. कै. महादेव इप्ते यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली रेश्मा, हेमलता व पुनम एक विवाहित मुलगा जितेंद्र, जावई, सून व नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.








Be First to Comment