Press "Enter" to skip to content

107 वर्षाची परंपरा असलेल्या बाप्पाचे प्रथमच कृत्रिम तलावात विसर्जन


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔷🔶🔶🔷


कर्जत शहरात राहणाऱ्या उगले परिवाराच्या बाप्पाला 107 वर्षाची परंपरा आहे, काल अनंत चतुर्थीला कर्जत नगरपरिषेदेच्या कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
कर्जत नगरपरिषेदेने शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व उल्हास नदीच्या पर्यावरणचे रक्षण करणे यासाठी नागरिकांना कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे आवाहन गणेश भक्तांना केले होते.

उगले परिवार नेहमीच नागरपालिकेच्या चांगल्या उपक्रमांना प्रतिसाद देऊन सहकार्य करत असतात. उगले बंधू याचे घर नदीच्या घाटा समोरच आहे, दीड दिवस,5 दिवस व अनंत चतुर्थी दिवशी नदीवर विसर्जन करण्यासाठी कमी गणेश भक्त आले असे प्रशांत उगले यांनी सांगितले.

भाविकांनी नगरपरिषदेच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देऊन आपापल्या ठिकाणी बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावात, घरात बाप्पाचे विसर्जन केले.
लोकां मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व नदीचे संवर्धन व प्रदूषण रोखणे या बदल जागरूकता निर्माण होत चालली आहे असेही उगले बंधू यांनी सांगितले.

उगले परिवाराच्या बाप्पाच्या विसर्जन समयी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक विवेक दांडेकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, किसान मोर्चा प्रदेश चे सुनील गोगटे, प्रज्ञा प्रकोष्ट चे मंदार मेहंदळे ,राहुल कुलकर्णी उपस्थित होते. उगले परिवारा तर्फे गर्दी टाळण्यासाठी जगदीश उगले, संजय उगले, प्रशांत उगले असे मोजकेच उपस्थित होते.

या वर्षी आम्ही कोणीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणाकडे ही बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो नाही व कुणाला बोलावले नाही असे उगले बंधू यांनी सांगितले.बाप्पाच्या उत्सवात नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडे दर्शनासाठी जाणे,त्यांचे आपल्याकडे येणे याची उणीव भासत होती. बाप्पाकडे एकच प्रार्थना केली जगावरचे कोरोनाचे संकट जाऊ दे रे बाप्पा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.