

पनवेल (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी, पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या वतीने आयोजित दोनदिवसीय कोजागिरी पौर्णिमा उत्सवास पनवेल परिसरातील नागरिक आणि युवकांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘समतेचा गर्व, युवकशक्तीचा जागर’ या संकल्पनेतून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सीमा ताई आठवले, राष्ट्रीय सचिव विनोद निकाळजे , आमदार विक्रांत पाटील , पनवेल महानगपालिका महापौर नितीन पाटील , सभागृह नेते प्रकाश बीनेदार, महिला आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस ॲड. अभयाताई सोनवणे ,मुंबई प्रदेश अध्यक्ष उषा रामलु आरपीआय महिला नेत्या सरीता वाडेकर , आरपीआय युवक आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस डॉ विजय मोरे , पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार ,पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे प्रिया मोरे यांची उपस्तीथी होती.
नवीन पनवेलमधील सेक्टर-१९ येथील शिवा कॉम्प्लेक्स पार्किंग, गणेश मार्केट जवळ पार पडलेल्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सामाजिक एकात्मता, युवकांमधील बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचा जागर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गरबा आणि विविध आकर्षक कार्यक्रमांची मेजवानी उत्सवानिमित्त गरबा तसेच विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उपस्थित नागरिकांना केसर दूध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सीमा ताई आठवले,राष्ट्रीय सचिव विनोद निकाळजे यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यां चा सत्कार, बक्षीस वितरण आणि आकर्षक कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला.
बक्षिसांची रेलचेल आणि आकर्षक बक्षिसे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी आणि स्पर्धांमधील विजेत्यांसाठी बक्षिसांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन, कुलर, स्मार्ट वॉच, चांदीचे दागिने आणि खास पैठणी यांसारख्या ५४ हून अधिक आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली. याशिवाय युवकांसाठी विशेष ‘जेन झी रिपब्लिकन’ आकर्षक टी-शर्टचेही वितरण करण्यात आले.
पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी उपक्रम युवक अध्यक्ष अक्षय विकास अहिरे, महासचिव वैष्णव उदय पाटील आणि उपाध्यक्ष अभिजित नीळकंठ गायकवाड ,दोस्ती ग्रुप ,कार्याध्यक्ष पंकज भगरे, उपाध्यक्ष – आशुतोष जालिंदर काळे, सचिव – अजय तात्यासाहेब खरात, कार्याध्यक्ष – पंकज प्रभाकर भगरे, संपर्क प्रमुख – शिवम जालिंदर काळे, तवकीर नाझिर अत्तार – सुरज दशरथ मधने, नविन पनवेल युवक आघाडी, अध्यक्ष – दिपराज कुणाल शिर्के, उपाध्यक्ष – उदय महेंद्र गायकवाड, सचिव – प्रतीक महेंद्र गायकवाड कार्याध्यक्ष – प्रेम सुनिल पगारे रोहन सोनावणे प्रज्वल चव्हाण व आरपीआय युवक आघाडी कार्यकर्ते यांच्या सहकार्यांने यशस्वीरीत्या पार पडला .



Be First to Comment