
मुंबई (पी.डी. पाटील ):- पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचलित तळेगाव विभाग हायस्कूल या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक व बिलघर गावचे सुपुत्र श्री कल्पेश मनोहर शिंदे सर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे अभ्यासक्रम समितीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने NEP 2020 अंतर्गत इयत्ता ९ वी व १० वी साठी वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण या विषयाचा मसुदा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्यांची तज्ज्ञ म्हणून निवड केली आहे ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
बिलघरच्या पहिल्या शाळेपासून सुरू झालेला शिंदे सर यांचा शैक्षणिक सेवेचा प्रवास आज राज्याच्या अभ्यासक्रम समितीपर्यंत पोहोचला आहे. हे कार्य आजच्या सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
एका महत्वाच्या व जबाबदार पदासाठी त्यांची उचित निवड झाल्याबद्दल पदमश्री परिवार आणि ॐ मन सामर्थ्यदाता ट्रस्ट परिवाराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले आहे. पदमश्री संस्थेच्या व बिलघर गावच्या इतिहासात या निवडीने मानाचा तुरा रोवल्याबद्दल कल्पेश शिंदे सरांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.



Be First to Comment