Press "Enter" to skip to content

आजपासून मुंबईत रिक्षा टॅक्सी भाड्यात अनुक्रमे १ रुपया आणि २ रुपयांची वाढ


दिनांक : १ सप्टेंबर २०२६ मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील)

मुंबई महानगर क्षेत्रात १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अनुक्रमे १ रुपया आणि २ रुपयांची वाढ लागू झाली आहे.नवे भाडेदर (मुंबई आणि परिसर)ऑटो-रिक्षा: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २७ रुपये (जुने भाडे २६ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर १८.२२ रुपये (जुना दर १७.१४ रुपये) करण्यात आला आहे.

काळी-पिवळी टॅक्सी: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपये (जुने भाडे ३१ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर २१.९० रुपये (जुना दर २०.६६ रुपये) करण्यात आला आहे.महत्त्वाची माहितीक्षेत्र: हा निर्णय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघरसह संपूर्ण एमएमआर (MMR) क्षेत्रात लागू आहे.मीटर कॅलिब्रेशन: वाहन चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर रिक्षा-टॅक्सी युनियन व आरटीओच्या नियमांनुसार बदलण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहीती सुत्राकडून मिळाली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.