Press "Enter" to skip to content

हैदराबाद( तेलंगणा )येथे होणा-या राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी रायगड चे सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख म्हणून निवड

पनवेल ( प्रतिनिधी ) भरतीय पोलीस दल आणि हैदराबाद पोलीस खेळ मंत्रालय भारत सरकार व तायकवांडो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित पोलीस गेम्स राष्ट्रीय तायक्वॅन्डो स्पर्धा बालयोगी इनडोअर स्टेडियम हैदराबाद येथे २३ ते २७ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी रायगडचे सुपुत्र तायकवोंडोचे आंतरराष्ट्रीय पंच व ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट यांची यांची तायकवोंडो खेळात निस्वार्थी पोलीस गेम्स तायकवोंडो राष्ट्रीय स्पर्धे साठी स्पर्धा प्रमुख म्हणुन निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी पंच म्हणुन प्रशांत घरत ची निवड झाली आहे तसेच रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील यांची तायक्वांदो खेळात निस्वार्थीपणे पंच प्रशिक्षक म्हणुन देशात व परदेशात आतापर्यंत करत आलेल्या उल्लेखनीय कामगीरी ची दखल घेत गेल्या वर्षी काश्मीर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पोलीस स्पर्धा ही सुभाष पाटील यांनी यशस्वीपणे पार पडल्या होत्या व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना व्हावा व भविष्यात देशातुन उत्कृष्ट पंच प्रशिक्षक व खेळाडू तयार होतील म्हणून देशातील या खेळाची अधीकृत शिखर संघटना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांनी सुभाष पाटील यांची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पोलीस गेम्स तायकवोंडो स्पर्धा प्रमुख पदी नेमणुक केली आहे. तसेच खेळाडु म्हणुन नवी मुंबई पोलीस मयुरी खरात हिची निवड झाली आहे मयुरी खरात गेली १५ ते १७ वर्ष तायक्वोन्डो प्रक्षिक्षण सुभाष पाटील यांच्या कडे घेत आहे

सुभाष पाटील , प्रशांत घरत व मयुरी खरात यांना वरील राष्ट्रीय पोलीस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएसन, तायक्जांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) से पदाधिकारी / प्रशिक्षक व आमदार प्रशांत ठाकुर साहेब , विधान परिषदेचे आमदार विक्रांत दादा पाटील साहेब व मा. सभागृह नेता परेश ठाकुर सर व महापौर नितीन पाटील साहेब यांनी विशेष अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.