


रोहा (समीर बामुगडे) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा व पर्यावरण पूरक सीड बॉल लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर माध्यमिक विद्यामंदिर रातवडच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच चार हजार सीडबॉलची लागवड लागवड करण्यात आली या पर्यावरण पूरक उपक्रमासाठी इंदापूर वन विभागाचे वनपाल राजमाने, वनरक्षक वैशाली भोर, अशोक पोहकडे, आमीना मनेर निलेश नाईकवडे तसेच रातवड हायस्कूलचे पालक शिक्षक संघाचे सदस्य प्रणिता साटम, जानवी शिंदे, अमोल जाधव, राम येलकर इत्यादी उपस्थित होते.
सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरामध्ये करंज, आवळा, आंबा, जांभूळ या वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले करण्यात आली.
यावेळी वनविभागाचे वनपाल श्री राजमाने म्हणणाले की सीड बॉल म्हणजे काय? पर्यावरणाला सीड बॉलचे फायदे तसेच जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन सीडबॉल च्या माध्यमातून कसे राखले जाते याची माहितीदेऊन घरच्या घरी सीड बॉल कसे बनवावे या बाबत उपयुक्त माहिती दिली
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष कदम यांनी अध्यक्षीय मनोगतात असे म्हटले की आपण निसर्गाचा भाग आहोत ही भावना मनात ठेवून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे तसेच पर्यावरण वाचविण्यासाठी आपण काय काय करू शकतो समाज म्हणून पर्यावरणाबाबत आपली भूमिका काय याबाबत अनमोल माहिती दिली त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मार्फत सुमारे चार हजार सीडबॉल लावण्यात आले
यावेळी पर्यावरण प्रमुख भिवा पवार सर तसेच विद्यालयातील शिक्षक डॉ. शारदा निवाते,राजेंद्र भगत, श्रीकृष्ण गरधे, बाळासाहेब गायकवाड,रजनी ऐत, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप लांगी, राज पतारे उपस्थित होते.
या उपक्रमाचे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, सरचिटणीस डॉ निलेशजी रेवगडे, शालेय समिती अध्यक्ष सुनील पाटील, यांनी या पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे असून पर्यावरण समृद्ध राहील असे उपक्रम दरवर्षी पर्यावरणाचे जतन, संगोपण संवर्धन होईल असे उपक्रम दरवर्षी करावेत असे सांगण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शारदा निवाते यांनी केले.



Be First to Comment